महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लोककल्पतर्फे जांबोटी येथे मोफत आरोग्य शिबिर

11:25 AM Jul 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या सीएसआर उपक्रमांतर्गत लोककल्प फाऊंडेशन व केएलई आयुर्वेदिक हॉस्पिटल यांच्यातर्फे जांबोटी येथे मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. कर्नाटक, महाराष्ट्र व गोव्याच्या सीमेवरील हे दुर्गम गाव असून तेथे नियमित आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत, याची नोंद घेऊन हे शिबिर घेण्यात आले. यावेळी आरबीएस, बीपी व अन्य तपासण्या करण्यात आल्या. तसेच फाऊंडेशनतर्फे मोफत औषधे देण्यात आली. 65 हून अधिक जणांनी शिबिराचा लाभ घेतला. याप्रसंगी लोककल्पचे सूरजसिंग रजपूत, स्वयंसेवक संतोष कदम, आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या डॉ. समता, डॉ. नंदिता, डॉ. सौरभ, कर्मचारी तसेच पीआरओ के. श्रीधर उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article