कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सावंतवाडीत उद्या बी. एफ्. ए. फाइन आर्ट बाबत मोफत मार्गदर्शन कार्यशाळा

12:35 PM Jan 31, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्टचे आयोजन

Advertisement

ओटवणे प्रतिनिधी
सावंतवाडी सालईवाडा वनभवन जवळील बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट येथे शनिवार १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता बी. एफ्. ए. फाइन आर्ट, अप्लाईड आर्ट (पदवी अभ्यासक्रम ) आणि त्यासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी प्रवेश परीक्षा संदर्भात मोफत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.पारंपरिक चित्रकला शिक्षणापेक्षा वेगळा असा अप्लाईड आर्ट अर्थात उपयोजित कला हा कला शिक्षणाचा आधुनिक दृष्टिकोन आहे. या कलेकडे केवळ आवड आणि छंद म्हणून न पाहता त्याचा व्यावसायिक दृष्टिकोनातून वापर वेगवेगळ्या प्रकारे कसा करावा तसेच या कलेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास ती विविध क्षेत्रात अधिक प्रमाणात परिणामकारक कसे ठरू शकते या विषयाचे मार्गदर्शन बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट या महाविद्यालयातील प्राध्यापक करणार आहेत.बी.एफ. ए उपयोजित व ललित कला अभ्यासक्रम सीईटी प्रवेश परीक्षा व या क्षेत्रातील करिअर संधी तसेच जाहिरात एजन्सी, ॲनिमेशन, पब्लिशिंग स्टुडिओ, गेमिंग स्टुडिओ ,VFX, UI-UX डिझाईन ( ॲप डिझाईन), चित्रपट निर्मिती, ई लर्निंग कंपन्या ,लेआउट डिझाईन, स्टोरी बोर्ड आर्टिस्ट, कन्सेप्ट आर्टिस्ट, टायपोग्राफी, कॅरेक्टर डिझाईन, AI टेक्नॉलॉजी आणि अशा अनेक संधी या अभ्यासक्रमामुळे निर्माण झाल्या आह या मार्गदर्शन कार्यशाळेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी ०२३६३२७५३६१ या दूरध्वनी क्रमांकावर तसेच श्री मोरजकर ९४०५८३०२८८ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन असे आवाहन बी. एस. बांदेकर कला महाविद्यालयाचे प्राचार्य उदय वेले यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat # sindhudurg #
Next Article