लोककल्पतर्फे मोफत नेत्रतपासणी शिबिर
‘सेव्हंथ डे अॅडव्हेंटिस्ट’ स्कूलच्या 650 हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला लाभ
बेळगाव : लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत लोककल्प फाऊंडेशनतर्फे ‘सेव्हंथ डे अॅडव्हेंटिस्ट’ इंग्लीश मीडियम प्रायमरी आणि हायस्कूल येथे मोफत नेत्रतपासणी शिबिर घेण्यात आले. आनंदनगर येथील लोकमान्य सोसायटी शाखा व डॉ. कोडकणी आय सेंटर यांच्या सहकार्याने दि. 20 रोजी हे शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी दोन्ही शाळांचे प्राचार्य अनुक्रमे जोसेफ, महादेव बी., सोसायटीचे एआरएम (सेल्स विभाग) संतोष कृष्णाचे, आनंदनगर शाखा व्यवस्थापक तेजश्री होसकली, साहाय्यक शाखा व्यवस्थापक स्मिता जाधव, सीएसआर विभाग निशांत जाधव, आरएमएम बेळगाव विभाग पारस पाटील उपस्थित होते. नेत्रतज्ञ डॉ. शिल्पा कोडकणी संचालित ‘एम. एम. जोशी-कोडकणी आय सेंटर’च्या नेत्रतज्ञांनी शिबिरामध्ये विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी, अंधूक दृष्टी, मोतीबिंदू व अन्य तपासण्या केल्या व पुढील उपचारांबाबत मार्गदर्शनही केले. या शिबिरात 650 हून अधिक विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी करण्यात आली.