For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुसमळी येथे लोककल्प फाऊंडेशनतर्फे मोफत नेत्रतपासणी शिबिर

11:17 AM Sep 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
कुसमळी येथे लोककल्प फाऊंडेशनतर्फे मोफत नेत्रतपासणी शिबिर
Advertisement

बेळगाव : लोककल्प फाऊंडेशनतर्फे कुसमळी (ता. खानापूर) येथे मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे 50 गावकऱ्यांनी शिबिराचा लाभ घेतला. शिबिरामध्ये सर्वसाधारण नेत्रतपासणी, मोतीबिंदू तपासणी व दृष्टीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. नेत्रतज्ञ राहुल मेदार, आदित्य अलगुडेकर आणि नेत्रदर्शन हॉस्पिटलचे उदयकुमार यांनी गावातील नागरिकांच्या तपासण्या केल्या. लोककल्प फाऊंडेशनतर्फे संतोष कदम व संदीप पाटील यांनी समन्वयक म्हणून कार्य पाहिले. लोकमान्य सोसायटीचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीच्या सीएसआर या उपक्रमांतर्गत दुर्गम भागातील गावांना प्राथमिक आरोग्य सुविधा, शिक्षण, रोजगार आणि पायाभूत सुविधा देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.