लोककल्प फौंडेशनतर्फे मोफत नेत्रचिकित्सा शिबिर
12:53 PM Apr 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : लोककल्प फाउंडेशन व नेत्रदर्शन आय हॉस्पिटल यांच्यावतीने हब्बनहट्टी व माण या गावांमध्ये मोफत नेत्रचिकित्सा शिबिर घेण्यात आले. नेत्रदर्शनच्या डॉ. सीमा एस. एम. व साहाय्यक व्यवस्थापक उदयकुमार, पवित्रा दानवडे यांच्या सहकार्याने गरजू रुग्णांवर मोतिबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्या. याबद्दल रुग्णांनी व ग्रामस्थांनी फाउंडेशन व नेत्रदर्शनला धन्यवाद दिले. लोकमान्य सोसायटीच्या सीएसआर उपक्रमांतर्गत हे शिबिर पार पडले.
Advertisement
Advertisement