गुजरातमध्येही मोफत वीज देऊ
केजरीवालांचे आश्वासन : मोफत रेवडी देवाचा प्रसाद
वृत्तसंस्था / अहमदाबाद
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुरुवारी गुजरात दौऱयावर पोहोचले. तेथे त्यांनी विधानसभा निवडणुकीर्पी आम आदमी पक्षाच्या पहिल्या हमीची घोषणा केली. केजरीवालांनी गुजरातमध्ये मोफत वीज पुरविण्याचे आश्वासन दिले आहे. महागाई सध्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे, विजेचे दर देखील सातत्याने वाढत आहेत. दिल्ली अन् पंजाबमध्ये आम्ही मोफत वीज दिली आहे, अशाचप्रकारे गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आल्यावर मोफत वीज पुरविणार असल्याचे केजरीवालांनी म्हटले आहे.
गुजरातमध्ये पहिली हमी म्हणून मोफत वीज पुरविण्याचे आश्वासन देत आहे. भाजपने 15 लाख रुपये देणार असल्याचे सांगितले होते, निवडून आल्यावर तो केवळ जुमला होता असे म्हटले होते. परंतु आम आदमी पक्ष हमी देतो, जर आम्ही कामे केली नाही तर पुढील वेळी मत देऊ नका असे उद्गार केजरीवालांनी काढले आहेत.
राज्यात सत्तेवर आल्याच्या 3 महिन्यांनी आम्ही प्रत्येक कुटुंबाला 300 युनिट मोफत वीज देणार आहोत. 24 तास वीज पुरवठा केला जाणार आहे. भारनियमन केले जाणार नाही. तसेच घरगुती वीज बिले माफ करण्याचा निर्णय घेऊ असे केजरीवालांनी म्हटले आहे.
गुजरातमध्ये मद्य सहजपणे उपलब्ध होते. आम्ही अवैध मद्य विकून देणगी जमा करणार नाही. आम्ही जनते जी मोफत रेवडी वाटली आहे, तो देवाचा प्रसाद आहे, मोफत वीज, मोफत शिक्षण देणे म्हणजे देवाचा प्रसाद आहे. परंतु भाजपचे नेते मोफत रेवडी केवळ स्वतःच्या मित्रांना देतात, त्यांची कर्जे माफ करतात हे पाप असल्याचे म्हणत केजरीवालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे.
जनतेला मोफत रेवडी दिल्याने श्रीलंकेसारखी स्थिती होत नाही. स्वतःच्या मित्र-मंत्र्यांना मोफत गोष्टी दिल्याने श्रीलंकेसारखी स्थिती होत असते. श्रीलंकेचे नेते स्वतःच्या मित्रांना मोफत रेवडी देत होते. जनतेला दिले असते तर ती त्यांच्या घरात घुसली नसती असा दावा केजरीवालांनी केला आहे.