For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

1 कोटी घरांना 300 युनिटपर्यंत मोफत वीज

06:45 AM Feb 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
1 कोटी घरांना 300 युनिटपर्यंत मोफत वीज
Advertisement

पंतप्रधान मोदींकडून ‘पीएम सूर्य घर : मोफत वीज योजने’ची घोषणा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सौरऊर्जा आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार लवकरच ‘पीएम सूर्य घर : मोफत वीज योजना’ सुरू करणार आहे. या योजनेच्या अंतर्गत 300 युनिटपर्यंत मोफत वीज प्रदान करत एक कोटी घरांना प्रकाशमान करण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेकरता 75 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक होणार असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी या योजनेची घोषणा केली आहे.

Advertisement

निरंतर विकास आणि लोकांच्या कल्याणासाठी आम्ही ‘पीएम सूर्य घर : मोफत वीज योजना’ सुरू करत आहोत. 75 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पाचे लक्ष्य प्रत्येक महिन्याला 300 युनिटपर्यंत मोफत वीज प्रदान करून 1 कोटी घरांना प्रकाशमान करणे असल्याचे मोदींनी सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद केले आहे.

ठोस अनुदानापासून मोठ्या सवलती, बँक कर्जाची सुविध प्रदान करत लोकांवर याचा कुठलाही भार पडू नये याची काळजी केंद्र सरकार घेणार आहे. सर्व संबंधित घटकांना एका राष्ट्रीय ऑनलाइन पोर्टलद्वारे एकीकृत केले जाणार आहे. या योजनेच्या अंतर्गत अनुदान थेट लोकांच्या बँक खात्यांमध्ये जमा केले जाणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले आहे.

या योजनेला तळागाळात लोकप्रिय करण्यासाठी शहरी पालिका आणि ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यक्षेत्रात छतावर सौरप्रणालीच्या वापराला चालना देण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. या योजनेद्वारे अधिक उत्पन्न, कमी वीज बिल आणि लोकांसाठी रोजगार निर्माण होणार असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

सर्व वीजग्राहकांनी विशेषकरून युवांनी प्ttज्s://ज्स्sल्rब्agarप्.gदन्.ग्ह वर अर्ज करत ‘पीएम सूर्य घर : मोफत वीज योजने’चा लाभ घ्यावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. या योजनेची घोषणा अलिकडेच अर्थसंकल्पात करण्यात आली होती.

ग्राहकांची होणार बचत

अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रुफटॉफ सोलर आणि मोफत वीज योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. या योजनेमुळे एक कोटी कुटुंबांची एकूण वर्षाकाठी 15-18 हजार कोटी रुपयांची बचत होणार अ सल्याचे सांगण्यात आले. तसेच ग्राहकांना अतिरिक्त वीज वितरण कंपन्यांना विकता येणार आहे. या योजनेमुळे इलेक्ट्रिकल वाहन चार्जिंची सुविधा वाढणार आहे. तसेच पुरवठा, इन्स्टॉलेशनकरता मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.

Advertisement
Tags :

.