लोककल्पतर्फे आमगाव येथे मोफत चष्म्यांचे वाटप
11:27 AM Jun 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : लोककल्प फौंडेशनतर्फे आमगाव (ता. खानापूर) येथील गरजू नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप हा उपक्रम राबविण्यात आला. यापूर्वी गावात घेण्यात आलेल्या नेत्रतपासणी शिबिरामध्ये दृष्टिदोष असलेल्या लाभार्थ्यांची निवड करून त्यांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना दैनंदिन जीवन अधिक सुलभ व प्रभावी करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी लोककल्पचे आभार मानले. यावेळी लाककल्पचे विठ्ठल कुन्नुरे व अभिषेक चिगुळकर यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.
Advertisement
Advertisement