For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोककल्पतर्फे आंबोली येथे मोफत चष्म्यांचे वाटप

11:50 AM May 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
लोककल्पतर्फे आंबोली येथे मोफत चष्म्यांचे वाटप
Advertisement

बेळगाव : लोककल्प फौंडेशनतर्फे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य आणि दृष्टिदोषाचे निवारण करण्याच्या उद्देशाने सोमवार दि. 4 रोजी आंबोली (ता. खानापूर) येथील नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप उपक्रम राबविण्यात आला. या आधी गावात घेतलेल्या शिबिरावेळी लाभार्थ्यांची निवड केली होती. या उपक्रमाबद्दल नागरिकांनी लोककल्पचे आभार मानले. लोककल्प फौंडेशनतर्फे खानापूर तालुक्यातील दत्तक घेतलेल्या 32 गावांतील नागरिकांना जीवनावश्यक सुविधांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने सातत्याने कार्य सुरू आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.