लोककल्प-सेंट्राकेअरतर्फे मधुमेह-रक्तदाब तपासणी मोफत शिबिर
12:27 PM May 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : लोकमान्य को-ऑप. सोसायटीच्या सीएसआर उपक्रमांतर्गत लोककल्प आणि सेंट्राकेअर हॉस्पिटलच्या बसवाण गल्ली आणि आर. के. गल्ली येथील शाखेतर्फे मोफत रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरामध्ये मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी करून आवश्यक नागरिकांना पुढील उपचारासाठी सल्लामसलत करण्यात आली. यामध्ये सुमारे 60 हून अधिक नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. सेंट्राकेअर हॉस्पिटलच्या डॉ. पार्वती होसपेठ, परिचारक प्रज्योत हिरेमठ, पीआरओ विनायक ताम्हणकर यांनी आरोग्य सुविधा दिली. यावेळी बसवाण गल्ली आणि आर. के. गल्ली या दोन्ही शाखांचे कर्मचारी, लोककल्पचे निशांत जाधव उपस्थित होते.
Advertisement
Advertisement