विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्लेतील वारकऱ्यांना मोफत देवदर्शन सहल
02:29 PM Jun 14, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
वेंगुर्ले । प्रतिनिधी
Advertisement
भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष व युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील ४५ वारकरी संप्रदायातील मंडळींना मोफत देवदर्शन सहलीचा शुभारंभ शनिवार दिनांक १५ जुन रोजी सायंकाळी ५ - ३० वाजता चांदेरकर महाराज विठ्ठल मंदिर येथे होणार आहे .मोहीनी एकादशी निमीत्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात विशाल परब यांनी नारायणराव राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातुन विजयी झाल्यावर वारकरी मंडळींना मोफत देवदर्शन सहल घडवून आणेन , असे अभिवचन दिले होते . त्याचीच पुर्तता म्हणुन तुळजापूर - अक्कलकोट - पंढरपूर - नृहसिंहवाडी - महालक्ष्मी कोल्हापूर अशी तीन दिवसांची सहल आयोजित करण्यात आली आहे .त्यामुळे वारकरी संप्रदायातील मंडळींमध्ये उस्ताहाचे वातावरण निर्माण झाले आहे .
Advertisement
Advertisement