सोनुर्ली येथे ८ रोजी मोफत छावा चित्रपट
न्हावेली / वार्ताहर
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित व त्यांची शौर्यगाथा सांगणारा छावा चित्रपट सोनुर्ली ग्रामस्थांच्या सहकार्यातून माऊली मंदिर नजीक उद्या रात्रौ ठीक ८.०० वाजता मोफत दाखवण्यात येणार आहे.अभिनेता विकी कौशल व तेलगू अभिनेती रश्मिका मंदाना यांची स्टारकास्ट असलेल्या हा छावा चित्रपटाला महाराष्ट्रासह इतर राज्यांत प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. रशिका प्रेक्षकांच्या मनावर सध्या या चित्रपटाने राज्य केले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास सर्वापर्यत पोहचवा या हेतूने सोनुर्ली ग्रामस्थ याच्या संकल्पनेतून 'छावा' हा चित्रपट एलईडी स्रिन वर उद्या ८ मार्च रोजी माऊली मंदिर नजिक रात्री ठिक ९ वाजता सर्वाना मोफत दाखविण्यात येणार आहे. ग्रामस्थांसह सर्व शिवप्रेमींनी चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून छञपती संभाजी महाराज यांचा चित्रपटाद्वारे दाखविण्यात आलेला इतिहास पाहावा, असे आवाहन सोनुर्ली ग्रामस्थांनी केले आहे.