१ मार्चला मळगावात मोफत 'छावा' चित्रपट
भिल्लवाडी गृप आणि मळगाव ग्रामस्थ यांच्याकडून खास एलईडी स्क्रिनद्वारे चित्रपटाचे आयोजन
न्हावेली / वार्ताहर
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित व त्यांची शौर्यगाथा सांगणारा चित्रपट छावा प्रदर्शित झाला आहे. अभिनेता विकी कौशल व तेलगू अभिनेत्री रश्मिका मंदाना यांची स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाला महाराष्ट्रासह इतर राज्यांत प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचावा या हेतूने मळगाव येथील भिल्लवाडी गृप व ग्रामस्थ यांच्या संकल्पनेतून ‘ छावा' हा चित्रपट एलईडी स्क्रिन वर छञपती शिवाजी महाराज चौक, मळगाव येथे दिनांक १ मार्च रोजी रात्री ठिक ९ वाजता सर्वांना मोफत दाखविण्यात येणार आहे. ग्रामस्थांसह सर्व शिवप्रेमींनी चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने छञपती शिवाजी महाराज चौक मळगाव येथे उपस्थित राहून छञपती संभाजी महाराज यांचा चित्रपटाद्वारे दाखविण्यात आलेला इतिहास पाहावा,असे आवाहन मळगाव भिल्लवाडी गृपचे अध्यक्ष समाजसेवक श्री.पांडुरंग राऊळ व ग्रामस्थ यांनी केले आहे.