महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

डेंग्यूसाठी मोफत तपासणी-उपचार

07:00 AM Jul 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राज्य सरकारची माहिती : आरोग्य खात्याच्या जिल्हा प्रशासनांना सक्त सूचना

Advertisement

बेंगळूर : राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये डेंग्यू तापाचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य खात्याच्या व्याप्तीतील सर्व आरोग्य केंद्रांमध्ये डेंग्यू तापाची मोफत तपासणी आणि उपचार केले जातील, अशी माहिती राज्य सरकारने गुऊवारी दिली. या संदर्भात एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. राज्य आणि जिल्हा पातळीवर डेंग्यू वॉर रुम स्थापन करणे, जिल्हास्तरीय टास्क फोर्स तयार करणे, हॉट स्पॉट्स ओळखणे, फिव्हर क्लिनिक सुरू करण्याबाबत आरोग्य जिल्हा प्रशासनांना सक्त सूचना दिल्या आहेत.

Advertisement

राज्यात सध्याच्या पावसाळ्यातील डेंग्यूची स्थिती लक्षात घेऊन डेंग्यूच्या ऊग्णांवर उपचार आणि व्यवस्थापनासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. या संदर्भात परिपत्रकात नमूद केलेल्या नियमांचे योग्य पालन करण्याचे सूचित केले आहे. आरोग्य खात्याच्या माहितीनुसार, यावषी जानेवारीपासून आतापर्यंत 7,840 डेंग्यू पॉझिटिव्ह ऊग्णांची नोंद झाली आहे. बेंगळूर महानगरपालिका व्याप्तीत सर्वाधिक 2,291 प्रकरणे आढळून आली आहेत.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व आरोग्य केंद्रांमध्ये सर्व बीपीएल किंवा एपीएल ऊग्णांना डेंग्यू तापाच्या प्रकरणाशी संबंधित आयसीयूसह सर्व तपासण्या आणि उपचार मोफत देण्यात यावेत, असे परिपत्रकात म्हटले आहे. शहरी भागात आशा, आरोग्य कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन तपासणी करावी, दररोज 200 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वयंसेवकांची नियुक्ती करावी. घराच्या आतील व बाहेरील पाणीसाठ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी लोकप्रतिनिधी, नागरिकांनी पुढाकार घ्यावा. तसेच संबंधित खात्यांनी डेंग्यू ताप नियंत्रण व उपचाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी, असे सांगण्यात आले आहे डेंग्यू ऊग्णांसाठी तालुका ऊग्णालयात किमान 5 बेड, जिल्हा ऊग्णालयात 8-10 बेड्सची व्यवस्था करावी. ऊग्णालयांमध्ये डेंग्यू ऊग्णांचे व्यवस्थापन आणि उपचार करण्यासाठी चाचणी किट, आवश्यक औषधांचा साठा करावा, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article