For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोककल्प-नेत्रदर्शनतर्पे बेटणे येथील रुग्णावर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

06:15 AM May 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
लोककल्प नेत्रदर्शनतर्पे बेटणे येथील रुग्णावर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया
Advertisement

त. भा. प्रतिनिधी

Advertisement

बेळगाव : लोककल्प फौंडेशन व नेत्रदर्शन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने बेटणे (ता. खानापूर) येथील एका रुग्णावर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. लोककल्प फाऊंडेशनतर्फे बेटणे गावात यापूर्वी घेण्यात आलेल्या नेत्रतपासणी शिबिरादम्यान संबंधित रुग्णामध्ये मोतिबिंदूचा आजार असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर लोककल्प फौंडेशन आणि नेत्रदर्शन हॉस्पिटल यांच्या आरोग्य उपक्रमांतर्गत रुग्णाला मोफत उपचार व मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी साहाय्यता पुरविण्यात आली. त्यामुळे नेत्रदर्शन हॉस्पिटलच्या डॉ. सीमा एम. यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली.

यावेळी नेत्रदर्शन हॉस्पिटलचे साहाय्यक व्यवस्थापक उदयकुमार यांनी शस्त्रक्रिया प्रक्रियेसाठी आवश्यक सहकार्य केले. लोककल्पचे अनिकेत पाटील व प्रितेश पोतेकर यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेमुळे दृष्टी सुधारलेल्या लाभार्थी रुग्णाने लोककल्पचे व नेत्रदर्शनचे आभार मानले. ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर व दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

Advertisement

Advertisement
Tags :

.