For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोककल्प फौंडेशनतर्पे कणकुंबी येथे रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

12:12 PM Feb 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
लोककल्प फौंडेशनतर्पे कणकुंबी येथे रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया
Advertisement

बेळगाव : लोककल्प फौंडेशनतर्फे नेत्रदर्शन सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल (डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटल युनिट) यांच्या सहकार्याने कणकुंबी येथील रुग्णाची मोतीबिंदूची मोफत शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. ही शस्त्रक्रिया डॉ. अवधुत वाघळे यांनी केली. नेत्रदर्शनचे साहाय्यक व्यवस्थापक उदयकुमार यावेळी उपस्थित होते. लोककल्पचे अनिकेत पाटील आणि किशोर नाईक यांनी समन्वयक म्हणून कार्य पाहिले. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.चे चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे रुग्णाच्या जीवनमानात सुधारणा झाली असून रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयानी कृतज्ञता व्यक्त केली.

Advertisement

Advertisement
Tags :

.