लोककल्पतर्फे पारवाड येथे मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर
12:30 PM Mar 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : लोककल्प फौंडेशनच्या डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटलच्या नेत्रदर्शन सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल युनिटतर्फे पारवाडमध्ये मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. डॉ. जगदीश पाटील यांनी या शस्त्रक्रिया केल्या. त्यांना नेत्रदर्शनचे व्यवस्थापक मणिकांत कुमार, साहाय्यक व्यवस्थापक उदयकुमार, लोककल्प फौंडेशनचे कर्मचारी अनिकेत पाटील व किशोर नाईक यांचे सहकार्य लाभले.
Advertisement
Advertisement