मालवणात १ रोजी मद्यमुक्तीसाठी मोफत अल्कोहोलीक्स ॲनाॅनिमसचा जनजागरण स्टॉल
मालवण | प्रतिनिधी
मद्यमुक्तीसाठी संपूर्ण जगभरात मागील ९० वर्षांपासून १९० पेक्षा जास्त देशात एक लाखा पेक्षा अधिक ए. ए. समूहाद्वारे लाखो मद्यपीडितांना मोफत मद्यमुक्त करणाऱ्या आणि मद्यपीडितांच्या मद्यमुक्तीसाठी अहोरात्र मोफत कार्य करणाऱ्या अल्कोहोलीक्स ॲनाॅनिमस् (ए. ए.) या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे संपुर्ण महाराष्ट्रातील शासकीय आणि खाजगी रुग्णालयात जनजागृती होत आहे. या अंतर्गत, १ ऑक्टोबर रोजी, मालवण ग्रामीण रुग्णालय येथे ए. ए. जनजागरण स्टॉल दिनांक १ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या दरम्यान लावण्यात येणार आहे. ए. ए. मालवणच्या समूहांतर्फे शहरात मद्यपीडितांच्या मोफत मद्यमुक्तीसाठी ए. ए. जनजागरण स्टॉल लावण्यात येणार असून या स्टॉल वर मद्यपीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियानां मोफत मार्गदर्शन आणि समुपदेशन करण्यात येणार असुन ए. ए. माहिती पत्रकाचे वाटप केले जाणार आहे. 'दारू हि तुमची किंवा तुमच्या कुटुंबाची समस्या झाली असेल आणि दारू थांबवण्याची मनापासून इच्छा असेल तर..', स्टॉलला आवश्य भेट द्यावी . मद्यमुक्तीच्या अधिक माहितीसाठी कृपया 9860436765 किंवा 9404165664 ,9420331011 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन अल्कोहोलीक्स ॲनाॅनीमस्, मालवण फेलोशिपतर्फे करण्यात येत आहे.