कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कर्ज वसुलीच्या बहाण्याने महिलेची 5 लाखांची फसवणूक

01:21 PM Apr 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खेड-लोटेतील प्रकार, पतीच्या जीवाला धोका असल्याचे समजताच दागिने ठेवले तारण

Advertisement

खेड : पतीने घेतलेले कर्ज परतफेड न केल्यास त्याला ठार मारू, अशी धमकी देत चारचाकी वाहनांतून आलेल्या एका टोळक्याने महिलेची 5 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार तालुक्यातील लोटे येथे घडला. याबाबत अद्याप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचे समजते. चारचाकी वाहनांतून आलेल्या अनोळखी टोळक्याने 5 लाखांसह पोबारा केला.

Advertisement

लोटे येथील एका कंपनीत ठेकेदाराकडे कंत्राटी पद्धतीने काम करणारा एक परप्रांतीय कुटुंबासह गेल्या 10-12 वर्षांपासून लोटे येथे वास्तव्यास आहे. काटकसर करत त्याने पत्नीसाठी त्याने सोन्याचे दागिने बनवून ठेवले होते. दोन दिवसापूर्वी अनोळखी टोळक्याने त्याच्या घरी जात पतीने घेतलेले कर्ज परतफेड न केल्यास ठार मारण्याची धमकी देत पैशांची व्यवस्था करण्यास सांगितले.

पतीच्या जीवाला धोका असल्याची बाब निदर्शनास येताच पत्नीने एका खासगी पतसंस्थेत सोन्याचे दागिने तारण ठेवत त्या अनोळखी टोळक्याला 5 लाख रुपये दिले. ही बाब पतीला समजताच त्याला धक्का बसला. कर्ज वसुलीच्या बहाण्याने फसवणूक केल्याचे लक्षात येताच महिलेलाही धक्का बसला. अनोळखी टोळके थांबलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता त्यातून काहीच निष्पन्न झाले नसल्याचे समजते.

Advertisement
Tags :
#crime news#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMediaratnagiri news
Next Article