For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भरमसाट परताव्याच्या आमिषाने फसवणूक

11:30 AM May 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
भरमसाट परताव्याच्या आमिषाने फसवणूक
Advertisement

टीव्ही कार्यक्रम पाहून स्कीप करण्याचा उद्योग : शहर सीईएन विभागात तक्रार दाखल

Advertisement

बेळगाव : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सुरूच आहेत. वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली अनगोळ येथील एका तरुणाला सव्वादोन लाख रुपयांना गंडविण्यात आले आहे. यासंबंधी शहर सीईएन विभागात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. ‘शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा, झटपट दामदुप्पट परतावा मिळवा’ असे आमिष दाखवत डॉक्टर, इंजिनिअर, सरकारी अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात ठकविल्याचे प्रकार घडले आहेत. वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातूनही फसवणूक सुरू झाली असून सायबर गुन्हेगारांची अशा प्रकरणांत कार्यपद्धती मात्र वेगळी आहे. अनगोळ येथील एका तरुणाला दोन महिन्यांपूर्वी टेलिग्रामवरून एक मेसेज आला. वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून घरबसल्या भरपूर कमवा, असा तो संदेश होता. व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन केल्यानंतर ‘कॉन टीव्ही’च्या व्हिडिओ क्लिप बघून तो स्कीप करण्याचा उद्योग होता. एवढ्यासाठी 10 हजारांच्या गुंतवणुकीला काही क्षणात 14 हजार रुपये परतावा दिला जात होता. केवळ 30 सेकंदांचा व्हिडिओ पाहता पाहता तो स्कीप केल्यानंतर गुंतवणुकीच्या काही पटीने अधिक रक्कम खात्यात जमा दिसायची. सुरुवातीला 10 हजार रुपये गुंतवणूक केल्यानंतर काही क्षणात 14 हजार रुपये सावजाच्या खात्यात जमा झाले. त्यामुळे भामट्यांवर विश्वास बसून गुंतवणुकीची रक्कम वाढवत गेली. रक्कम वाढल्यानंतर परतावा बंद झाला. 14 हजार रुपयांना 30 हजार रुपये, 30 हजार रुपयांना 80 हजार रुपये परत देण्यात येतील, असे आश्वासन सायबर गुन्हेगारांनी दिले होते. 2 एप्रिल 2024 रोजी शेवटची गुंतवणूक केल्यानंतर परतावा बंद झाला असला तरी गुन्हेगारांचे मोबाईल मात्र अद्याप सुरू आहेत. ते अजूनही ‘तुम्ही गुंतवणूक करा’ असे सावजाला सांगत आहेत. या तरुणाने एकूण 2 लाख 12 हजार रुपये गमावले असून याप्रकरणी सीईएनचे अधिकारी तपास करीत आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.