For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur Crime : सोलापुरात पोलीस असल्याचे सांगून दीड लाखांची फसवणूक

05:05 PM Dec 25, 2025 IST | NEETA POTDAR
solapur crime   सोलापुरात पोलीस असल्याचे सांगून दीड लाखांची फसवणूक
Advertisement

                            साध्या वेशातील पोलीस सांगून वृद्धांपासून दागिने लंपास

Advertisement

सोलापूर : साध्या वेशातील पोलीस असल्याची बतावणी करून दोन अज्ञात व्यक्तींनी एका वृद्धाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना मडकी बस्ती परिसरात घडली. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दुपारी १.२०च्या सुमारास मडकी बस्ती पादचारी पुलाजवळ नागोबा मंदिराजवळील नाल्याजवळ फिर्यादी भीम दगडु वडतिले (वय ६६, रा. सवेरा नगर, सैफुल, विजापूर रोड) हे त्यांच्या चुलत बहिणीचे पती राजू सुरवसे यांच्यासोबत जातअसताना ही घटना घडली.

काळ्या-पांढऱ्या रंगाच्याबुलेटवरून आलेल्या अज्ञात दोन व्यक्तींनी फिर्यादीची दुचाकी अडवून आम्ही साध्या वेशातील पोलीस असल्याचे सांगितले. तपासणीच्या नावाखाली फिर्यादीकडील १५ ग्रॅमचे सोन्याचे लॉकेट व अर्धा तोळा बजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या रुमालात बांधण्यास सांगून हातचलाखीने ते दागिने चोरून आरोपी पसार झाले. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.