For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रमोदा हजारे यांची फसवणूक

11:30 AM Jan 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
प्रमोदा हजारे यांची फसवणूक
Advertisement

लष्करी जवानासह पाच जणांविरुद्ध एफआयआर

Advertisement

बेळगाव : सामाजिक कार्यकर्त्या प्रमोदा हजारे यांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून बिजगर्णी (ता. बेळगाव) येथील एका लष्करी जवानासह त्याच्या कुटुंबातील पाच जणांविरुद्ध बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने एकच खळबळ माजली आहे. प्रमोदा हजारे यांनी फेसबुकवर मैत्री झालेल्या लष्करी जवान अक्षय गणपती नलवडे याच्याशी विवाह केला आहे. गेल्या सहा वर्षांपासून या दोघा जणांची मैत्री होती. 12 मार्च 2020 रोजी चौगुलेनगर मच्छे येथील घरात या दोघा जणांनी विवाह केला आहे, असे असताना अक्षयने आता दुसरे लग्न करण्यासाठी धडपड सुरू केली आहे.

फेसबुकवर मैत्री झाली त्याचवेळी आपण वयाने तुझ्यापेक्षा मोठे आहोत, ही गोष्ट प्रमोदा यांनी अक्षयला सांगितली. वयात काय आहे? तो केवळ नंबर असतोय. माझ तुझ्यावर खर प्रेम आहे, असे सांगत अक्षयने लग्नही करून घेतले. लग्नानंतर सासरी घेऊन जाण्याची मागणी केल्यानंतर अक्षय टाळत होता. वेगवेगळी कारणे देत घरी घेऊन जाण्यास नकार देत होता. लग्नाची नोंदणी करण्याची मागणी केल्यानंतर अक्षय नकार देत होता. नेंदणी करायची असेल तर तू माझ्याबरोबर राहायचे नाही, तुला घरीही घेऊन जाणार नाही. दुसरे लग्न करण्यासाठी परवानगी देऊन पत्र लिहून दे, अशी मागणी करण्यात आली. पत्र देण्यास नकार दिल्यामुळे प्रमोदा यांना अर्वाच्च शिविगाळ करण्यात आली आहे. त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे.

Advertisement

दोन महिन्यांपूर्वी कुटुंबीय अक्षयचे लग्न करण्याच्या तयारीत होते. त्यावेळी प्रमोदा यांनी बिजगर्णी येथील त्यांच्या घरी जाऊन अक्षयने आपल्याशी लग्न केल्याचे सांगितले होते. तरीही त्यांनी घरी घेतले नाही. आपली फसवणूक केल्याचा आरोप करत प्रमोदा नलवडे यांनी अक्षय गणपती नलवडे, शांता गणपती नलवडे, रुपेश गणपती नलवडे, अश्विनी पांडुरंग चव्हाण, ज्योती रुपेश नलवडे या पाच जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. भारतीय दंड संहिता 498 (ए), 313, 420, सहकलम 149 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ पुढील तपास करीत आहेत.

पोलिसांत धाव...

प्रमोदा हजारे या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. महिला संघटनांच्या माध्यमातून अनेक महिलांना न्याय देण्यासाठी त्यांनी आंदोलने छेडली आहेत. आता त्यांच्यावरच अन्याय झाला आहे. आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध त्यांनी पोलिसांत धाव घेतली आहे.

Advertisement
Tags :

.