For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सोलापूरमध्ये फसवणुकीची घटना; ऊसतोड कामगार पुरवितो म्हणून सव्वादहा लाखांची फसवणूक

02:07 PM Mar 09, 2026 IST | NEETA POTDAR
सोलापूरमध्ये फसवणुकीची घटना  ऊसतोड कामगार पुरवितो म्हणून सव्वादहा लाखांची फसवणूक
Advertisement

                                 सोलापूरमध्ये शेतकऱ्याची मोठी फसवणूक;

Advertisement

सोलापूर- ऊसतोड कामगार पुरवितो म्हणून सव्वादहा लाखांची फसवणूक करणाऱ्याविरुद्ध करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शहाजी जगन्नाथ पाटील (वय ५०, रा. पेहे, ता. पंढरपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कृष्णा दत्तू सावरा (रा. पळस, पाडापोस्त, पोसेरा, ता.मोखाडा, जि. पालघर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहाजी पाटील हे ऊस उत्पादक असून त्यांना ऊसतोडीसाठी मजुरांची गरज होती. त्यामुळे पाटील यांनी कृष्ण सावरा याच्याशी १६ मार्च २०२५ रोजी करार केला होता. सावरा याने ३६ ऊसतोड कामगार पुरवितो म्हणून पाटील यांच्याकडून १० लाख २४ हजार रुपये घेतले होते. पैसे घेऊनही सावरा याने कामगार न पुरविता फसवणूक केली.

Advertisement

Advertisement
Tags :

.