फ्रान्सचा लॅनिएर, अॅन सेयाँग विजेते
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रविवारी येथे झालेल्या 2026 च्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत फ्रान्सच्या अॅलेक्स लॅनिएरने पुरूष एकेरीचे तर अॅन सेयाँगने महिला एकेरीचे जेतेपद पटकाविले.
रविवारी खेळविण्यात आलेल्या पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात अॅलेक्स लॅनिएरने नाराओका कोदाईचा 21-11, 21-11 अशा सरळ गेम्समध्ये 50 मिनीटांच्या कालावधीत फडशा पाडत सुर्वणपदकाला गवसणी घातली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पुरूष एकेरीचे जेतेपद मिळविणारा लॅनिएर हा फ्रान्सचा पहिला बॅडमिंटनपटू ठरला आहे. या अंतिम सामन्यात लॅनिएरने 64 पैकी 42 गुण घेत जेतेपदावर शिक्कामोर्तब केला. नववा मानाकिंत लॅनिएर हा 2025 मध्ये युरोपियन चॅम्पियनशीप स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. त्याने कॅनडाच्या व्हिक्टर लेईचा 16-21, 21-13, 21-14 अशा गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली. या स्पर्धेत कॅनडाच्या लेईला सलग दुसऱ्यांदा कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात विद्यमान ऑलिम्पिक चॅम्पियन अॅन सेयाँगने यामागुची अकानेचा 21-17, 21-14 अशा गेम्समध्ये पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेत सेयाँगने एकही गेम न गमविता सुवर्णपदक मिळविले आहे. यामागुचीने आतापर्यंत तीनवेळा विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत विजेतेपद मिळविले असून गेल्यावर्षी तिने पॅरिसमध्ये झालेल्या या स्पर्धेत अजिंक्यपद मिळविले होते. तिचे हे दुसरे विश्व अजिंक्यपद आहे. या वर्षात तिने याआधी 9 पैकी 7 स्पर्धा ज्ंिाकल्या आहेत.