For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फ्रान्सने भारतासाठी ट्रम्प यांना सुनावले

06:25 AM Jan 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
फ्रान्सने भारतासाठी ट्रम्प यांना सुनावले
Advertisement

भारत कुणाचा दास होणार नाही : मॅक्रॉन

Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

भारत आता कुणाची वसाहत ठरू शकत नाही. भारत स्वत:च्या सामरिक स्वायत्ततेशी कुठल्याही स्थितीत तडजोड करण्यास तयार होणार नाही असे उद्गार फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी काढले आहेत. मॅक्रॉन हे पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर येणार असून त्यापूर्वी त्यांनी केलेली ही टिप्पणी अमेरिकेला उद्देशून असल्याचे मानले जातेय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अनियंत्रित हुकुमशहाप्रमाणे वागत असल्याचा मतप्रवाह जागतिक स्तरावर निर्माण होत असून या पार्श्वभूमीवर मॅक्रॉन यांनी भूमिका मांडली आहे.

Advertisement

अमेरिकेच्या आक्रमक आंतरराष्ट्रीय धोरणांदरम्यान जग विविध गटांमध्ये विभागले जात असताना फ्रान्सने उघडपणे भारताच्या भूमिकेचे समर्थन पेले आहे. पॅरिसमध्ये विदेशमंत्री एस. जयशंकर यांच्या भेटीदरम्यान मॅक्रीन यांनी भारतासारखा देश ‘कुणाचा दास होणार नाही’ असे स्पष्ट पेले. पहलगाम हल्ल्यानंतर रणनीकि स्वरुपात आणि ट्रम्प यांच्या शुल्क धोरणावरुन भारताने घेतलेल्या भूमिकेची जागतिक स्वीकारार्हता वाढत असून मॅक्रॉन यांनी त्याच मुद्द्यावरून ही टिप्पणी केली आहे.

भारत दौऱ्यावर येणार मॅक्रॉन

फ्रान्सच्या अध्यक्षांनी पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या एआय इम्पॅक्ट परिषदेत सामील होण्यास होकार दर्शविला आहे. या परिषदेच्या माध्यमातून भारताला ग्लोबल साउथच्या नेतृत्वासाठी स्वत:चा अजेंडा निश्चित करण्याची संधी प्राप्त होणार आहे. या परिषदेत ब्राझीचे अध्यक्ष आणि कॅनडाचे पंतप्रधानही सामील होतील. एकीकडे अमेरिकेने स्वत:ला 66 आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर काढले असताना प्रमुख जागतिक संघटनांमध्ये भारताची भूमिका वाढत आहे.

भारताचा वाढता प्रभाव

भारत युरोपसोबत स्वत:चे संबंध मजबूत करत असून आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था आणि भूराजकारणात अधिक स्थिरता आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे जयशंकर यांनी फ्रान्सचे विदेशमंत्री जीन-नोएल बॅरोट यांच्यासोबतच्या चर्चेदरम्यान म्हटले आहे.  तर प्रथम जयशंकर यांनी बॅरोट, पोलंडचे उपपंतप्रधान राडोस्लाव सिकोरस्की आणि जर्मनीचे विदेशमंत्री जोहान वाडेफुल यांच्यासाब्sात पहिल्या भारत-वेइमर फॉर्मेट बैठकीत भाग घेतला. आमची चर्चा मुख्यत्वे तीन मुद्द्यांवर आधारित होती, यात भारत-युरोपीय महासंघाचे संबंध, हिंद-प्रशांत क्षेत्र आणि युक्रेन संघर्ष सामील होता असे जयशंकर यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.