महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

व्होडाफोन-आयडीचा एफपीओ खुला

07:00 AM Apr 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

किरकोळ गुंतवणूकदार 22 एप्रिलपर्यंत बोली लावू शकतील

Advertisement

वृत्तसंस्था /मुंबई

Advertisement

फॉलो-ऑन सार्वजनिक ऑफर म्हणजे दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडीया (व्हीआय) चा एफपीओ गुरुवारी खुला झाला आहे. कंपनीला या इश्यूद्वारे 18,000 कोटी रुपये उभारायचे आहेत. किरकोळ गुंतवणूकदार 22 एप्रिलपर्यंत  या एफपीओसाठी बोली लावू शकतात. कंपनीचे हे समभाग 25 एप्रिल रोजी मुंबई शेअर बाजार व राष्ट्रीय शेअर बाजारात नोंदणीकृत केले जाणार आहेत. यापूर्वी व्हीआयने 74 अँकर गुंतवणूकदारांकडून 5,400 कोटी रुपये उभे केले आहेत.

किमान व कमाल किता गुंतवणूक करता येते?

या एफपीओसाठी किरकोळ गुंतवणूकदारांना किमान एका लॉटसाठी अर्ज करता येणार आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना 14,278 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. जास्तीत जास्त 14 लॉटसाठी बोली लावण्याची संधी मिळणार आहे.

व्हीआय अँकरनी 5,400 कोटी उभारले

एफपीओ खुला होण्याच्या अगोदर व्हीआयने 74 अँकर गुंतवणूकदारांकडून 5,400 कोटी रुपये उभारले आहेत, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

एफपीओ म्हणजे काय?

फॉलो ऑन पब्लिक ऑफर (एफपीओ) ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे स्टॉक एक्स्चेंजवर आधीच सूचीबद्ध असलेली कंपनी गुंतवणूकदारांना किंवा विद्यमान भागधारकांना, सामान्यत: प्रवर्तकांना नवीन समभाग जारी करते. सोप्या भाषेत समजल्यास, शेअर बाजारात सूचीबद्ध कंपन्या दुय्यम बाजारात नवीन शेअर्स जारी करून निधी उभारतात.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article