महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एफपीआय विक्रीतील कल कायम

06:41 AM Nov 14, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नोव्हेंबरच्या 10 दिवसांमध्ये सुमारे 6 हजार कोटी रुपये काढले

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांद्वारे विक्रीची प्रक्रिया म्हणजेच एफपीआय मधील होणार होय. यामधील झालेल्या आकडेवारीवर नजर टाकली तर, नोव्हेंबरमध्ये एफपीआयने भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 5,800 कोटी रुपयांहून अधिक पैसे काढले आहेत. वाढलेले व्याजदर आणि मध्यपूर्वेतील भौगोलिक-राजकीय तणाव यामुळे ही विक्री होत असल्याचे तज्ञांचे मत आहे.

यामध्ये डिपॉझिटरी डेटा पाहिल्यास, एफपीआयने यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात 24,548 कोटी रुपये आणि सप्टेंबर महिन्यात 14,767 कोटी रुपये काढले होते. डिपॉझिटरी डेटा दर्शविते की एफपीआयने 1-10 नोव्हेंबर दरम्यान 5,805 कोटी रुपयांचे शेअर्स विकले.

तज्ञांचे म्हणणे आहे की ‘सप्टेंबर महिन्यात सुरू झालेली एफपीआय विक्री ऑक्टोबरमध्ये दिसून आली होती आणि आता तीच या महिन्यातही दिसून येईल. मात्र, या महिन्यात विक्रीचा वेग नक्कीच कमी झाला आहे. जर आपण विक्रीची कारणे समजून घेतली तर, याचे मुख्य कारण म्हणजे इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षासह यूएस ट्रेझरी बॉण्ड उत्पन्नात वाढ. तज्ञांचे मत आहे की, सोने आणि डॉलर यांसारख्या सुरक्षित मालमत्तेवर लक्ष केंद्रित केले जाऊ शकते.

निवडणुकीपूर्वी बाजारात तेजी शक्य

पाच सार्वत्रिक निवडणुकांप्रमाणेच सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी शेअर बाजार वाढण्याची शक्यता आहे. विक्री सुरू होण्यापूर्वी मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्यांत विदेशी गुंतवणूकदारांकडून सातत्याने खरेदी होत होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article