फॉक्सकॉनकडून 30 हजार उमेदवारांची भरती
नवी दिल्ली :
आयफोन निर्मिती करणारी कंत्राटदार कंपनी फॉक्सकॉनने अलिकडेच आपल्या कारखान्यामध्ये 30 हजार नव्या उमेदवारांना सामावून घेतले आहे. यामध्ये विशेष म्हणजे 80 टक्के उमेदवार या महिला असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
बेंगळूर जवळच्या देवनहळ्ळी येथे असलेल्या आपल्या आयफोन निर्मितीच्या कारखान्यामध्ये नव्याने 30 हजार जणांना सामावून घेतले आहे. ही भरती गेल्या 9 महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे. 300 एकर इतक्या विस्तीर्ण क्षेत्रफळात सदरचा कारखाना अॅपलची कंत्राटदार कंपनी फॉक्सकॉनची स्थापना करण्यात आली असून तेथे महिला उमेदवार या 19 ते 24 वयोगटातील घेण्यात आल्या आहेत.
आयफोन 16 ची निर्मिती करण्यासोबत आयफोन 17 प्रो मॅक्स याची निर्मिती या कारखान्यामध्ये केली जात आहे. एवढेच नव्हे तर या कारखान्यामध्ये तयार झालेले आयफोन निर्यात केले जात आहेत.