For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजप उमेदवारांची चौथी यादी जाहीर

06:34 AM Mar 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
भाजप उमेदवारांची चौथी यादी जाहीर
Advertisement

तामिळनाडूतील 14 नावे समाविष्ट

Advertisement

► वृत्तसंस्था/ चित्रदुर्ग

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची चौथी यादी शुक्रवारी जाहीर केली. या यादीत तामिळनाडू आणि पुदुच्चेरी येथील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपच्या या यादीत एकूण 15 उमेदवारांची नावे असून तामिळनाडूसाठी 14 नावांची घोषणा करण्यात आली आहे. पुदुच्चेरी लोकसभा जागेवर भाजपने ए. नमशिवायम यांना उमेदवारी दिली आहे. ही जागा सध्या काँग्रेसकडे आहे. काँग्रेसचे व्ही. वैथिलिंगम येथून खासदार आहेत. काँग्रेसने त्यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे.

Advertisement

तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या 39 जागांसाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला तामिळनाडूतून एकही जागा मिळाली नव्हती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीसाठी भाजपने प्रभावी उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपने गुरुवारी तिसऱ्या यादीत 9 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. यामध्ये भाजपचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई, केंद्रीय मंत्री एल मुऊगन आणि तेलंगणाच्या माजी राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांचा समावेश होता.

चौथ्या यादीतीतील उमेदवार

पोन व्ही. बालगणपती           तिऊवल्लूर

आरसी पॉल कनगराज चेन्नई (उत्तर)

अश्वथामन              तिऊवन्नमलाई

के. पी. रामलिंगम                    नमक्कल

ए. पी. मुऊगानंदम                  तिऊपूर

के. वसंतराजन                पोल्लाची

व्ही. व्ही. सेंथिलनाथन         करूर

पी कार्तियायिनी             चिदंबरम

एसजीएम रमेश              नागापट्टिनम

एम मुऊगानंदम              तंजावर

देवनाथन यादव              शिवगंगा

रामा श्रीनिवासन            मदुराई

राधिका सरथकुमार                विऊधुनगर

बी. जॉन पांडियन           टेंकासी

Advertisement
Tags :

.