महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सलग चौथी घसरण : गुंतवणूकदारांना फटका

07:29 AM May 12, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

घसरणीचा प्रवास सुरुच ः दिग्गज कंपन्या नुकसानीत

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

चालू आठवडय़ातील तिसऱया सत्रात बुधवारी घसरणीचा कल भारतीय भांडवली बाजारात राहिल्याचे दिसून आले आहे. यामध्ये दिग्गज कंपन्यांचे समभाग घसरणीत राहिल्याने याचा फटका गुंतवणूकदारांना बसल्याचे पहावयास मिळाले. यामध्ये सेन्सेक्स 276.46 अंकांनी नुकसानीत राहिला होता.

दिवसभरातील कामगिरीनंतर बीएसई सेन्सेक्सने प्रारंभीची तेजी गमावत अंतिमक्षणी 276.46 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 54,088.39 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 72.95 अंकांनी घसरुन निर्देशांक 16,167.10 वर बंद झाला आहे.

प्रमुख कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इन्फोसिस यांच्या समभागात मोठी विक्री झाल्याने सेन्सेक्सला मोठय़ा प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे. या व्यतिरिक्त संस्थात्मक गुंतवणूकदारांनी विक्री केल्याने आणि कच्चे तेल यांच्या किमतीमधील तेजीने बाजारात नकारात्मक प्रभाव राहिला आहे.

महागाईचे आकडे येण्याचे संकेत

चालू आठवडय़ामध्ये ग्राहक किमत निर्देशांकावर आधारीत महागाई व औद्योगिक उत्पादनाचे आकडे सादर होण्याचे संकेत आहेत. त्या अगोदरच शेअर बाजारात नकारात्मक वातावरण राहिले असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.

जागतिक बाजाराची स्थिती

जागतिक बाजारांमध्ये आशियातील अन्य बाजारात जपानचा निक्की, हाँगकाँगचा हँगसेंग आणि चीनचा शांघाय कम्पोझिट हे वाढीसह बंद झालेत तर अन्य बाजारात दक्षिण कोरियाचा कोस्पी घसरणीत व युरोपीयन बाजार दुपारपर्यंत   तेजीत राहिले आहेत.  सेन्सेक्समधील लार्सन ऍण्ड टुब्रो, बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी, बजाज फायनान्स, मारुती सुझुकी, पॉवरग्रिड आणि आयटीसी यांचे समभाग तोटय़ात राहिले आहेत. ऍक्सिस बँक, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, भारती एअरटेल यांचे समभाग मात्र लाभासह बंद झाले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article