महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

के. आर. शेट्टी लायाजकडे फोर्थ डिव्हिजन चषक

09:57 AM Mar 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रामलिंग पाटील सामनावीर, प्रणय शेट्टीची आकर्षक खेळी

Advertisement

बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए चषक फोर्थ डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात के. आर. शेट्टी लायाजने युनियन जिमखाना ब चा 15 धावांनी पराभव करून फोर्थ डिव्हिजन चषक पटकाविला. अष्टपैलू कामगिरी केलेल्या रामलिंग पाटीलला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. केएससी मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात युनियन जिमखाना ब संघाने एमसीसी अकादमीचा 20 धावांनी पराभव केला. युनियन जिमखाना प्रथम फलंदाजी करताना 28 षटकात 8 गडी बाद 227 धावा केल्या. त्यात प्रसाद नाकाडी 4 षटकार, 4 चौकारासह 80 तर सुशांत पाटीलने 41 धावा केल्या. एमसीसीतर्फे दादापीर हाजीने 55 धावात 5 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना एमसीसी अकादमीने 28 षटकात 8 गडी बाद 207 धावा केल्या. त्यात अनिरूद्ध एस. ए. ने 12 चौकारासह 103 धावा करून शतक झळकाविले. अशोक बानीने 41 धावा केल्या. जिमखानातर्फे सुशांत कोवाडकरने 4, अक्षय जुवेकरने 2 गडी बाद केले. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात के. आर. शेट्टीने प्रथम फलंदाजी करताना 30 षटकात 3 गडी बाद 282 धावा केल्या.

Advertisement

त्यात अनुराग बाजपेयीने 7 षटकार, 11 चौकारासह 112, रामलिंग पाटीलने नाबाद 80 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना हावेरी जिल्हा संघाचा डाव 14.2 षटकात 77 धावात आटोपला. त्यात रक्षकने 13 धावा केल्या. के. आर. शेट्टीतर्फे मिलींद बेळगावकरने 22 धावांत 6 गडी बाद केले. अंतिम सामन्यात के. आर. शेट्टीने प्रथम फलंदाजी करताना 30 षटकात 9 गडी बाद 190 धावा केल्या. त्यात प्रणय शेट्टीने 2 षटकार, 7 चौकारांसह 62, गिरीष नाडकर्णीने 3 चौकारासह 34, रामलिंग पाटीलने 2 चौकारांसह 22 तर गुरु पोतदार व प्रशांत लायंदर यांनी प्रत्येकी 13 धावा केल्या. जिमखानातर्फे प्रसाद नाकाडीने 35 धावांत 3, संदीप चव्हाणने 2 तर आर. एन. कांबळे, शुभम भादवणकर, राहुल नाईक यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना युनियन जिमखानाचा डाव 26 षटकात 175 धावांत आटोपला. त्यात गणेश कंग्राळकरने 8 चौकारांसह 48, प्रसाद नाकाडी व सुशांत पाटील यांनी प्रत्येकी 25, अक्षय जुवेकरने 22 धावा केल्या. शेट्टीतर्फे रामलिंगने 43 धावांत 4, अनुराग बाजपेयीने 17 धावात 3 गडी बाद केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article