For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ग्रा. पं.ची तब्बल साडेचौदा कोटींची वीजबिल थकबाकी

10:08 AM Mar 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
ग्रा  पं ची तब्बल साडेचौदा कोटींची वीजबिल थकबाकी
Advertisement

हेस्कॉम खाते अडचणीत : वारंवार सूचना करूनही भरणा करण्याकडे ग्र्रामपंचायतींचे दुर्लक्ष

Advertisement

बेळगाव : हेस्कॉमकडून ग्राम पंचायतींना पाणीपुरवठा व पथदीप व्यवस्थेसाठी वीजपुरवठा केला जातो. ग्रा. पं. नी वेळच्यावेळी विद्युतबिल भरणे गरजेचे असते. परंतु, बेळगाव तालुक्यातील अनेक ग्राम पंचायतींनी विद्युतबिल थकविले आहे. तब्बल 14 कोटी 50 लाख रुपयांचे बिल थकीत असून त्याच्या वसुलीसाठी हेस्कॉमकडून ग्राम पंचायतींना सूचना करण्यात आल्या आहेत. सरकारी विभागांची मोठ्या प्रमाणात थकबाकी शिल्लक राहिल्याने हेस्कॉम प्रशासन आर्थिक अडचणीत सापडले आहे. बेळगाव जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, तसेच सरकारी विभागांकडून कोट्यावधी रुपयांचे विद्युतबिल थकीत आहे. अनेकवेळा विनंती करूनदेखील विद्युतबिल भरण्यात आले नसल्याने कारवाईचा इशारा हेस्कॉमने दिला आहे. वर्षभरापूर्वी हेस्कॉमने थकबाकी असलेल्या काही ग्राम पंचायतींना सूचना करून देखील बिल भरले नव्हते. अखेर काही ग्राम पंचायतींचा पथदीपांसाठीचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. त्यानंतर काही ग्राम पंचायतींनी थोडी रक्कम हेस्कॉमकडे जमा केली होती. त्यानंतर पुन्हा थकबाकी वाढली असून आता 14 कोटी रुपये ग्राम पंचायतींची शिल्लक आहे.

तीन ग्राम पंचायतींचे शून्य रुपये बिल

Advertisement

एकीकडे काही ग्राम पंचायतींचे कोटी रुपये विद्युतबिल थकीत असताना बेळगाव तालुक्यातील तीन ग्राम पंचायतींनी वेळच्यावेळी विद्युतबिल भरले आहे. कुद्रेमनी, तुरमुरी व मंडोळी या तीन ग्राम पंचायतींचे विद्युतबिल शून्य रुपये आहे. त्यामुळे या ग्राम पंचायतींचे हेस्कॉमकडून कौतुक करण्यात आले आहे. या पंचायतींचा आदर्श इतर पंचायतींनी घेणे आवश्यक आहे.

निर्णय...

बेळगाव तालुक्यातील अनेक ग्राम पंचायतींनी मागील अनेक महिन्यांपासून हेस्कॉमची थकबाकी केली आहे. तब्बल 14 कोटी रुपये ग्राम पंचायतींची थकबाकी असून विद्युतबिल भरण्यासाठी ग्राम पंचायतींना वारंवार सूचना करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून निधी मंजूर होताच बिल भरले जाईल, असे ग्राम पंचायतींकडून सांगण्यात येत आहे.

- विनोद करुर (प्रभारी कार्यकारी अभियंता)

Advertisement
Tags :

.