महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चार अपघातांमध्ये चार युवक ठार

12:11 PM Jan 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी, ताळगाव, वाळपई, भोम येथील भीषण अपघात : राज्यात 24 तासांत 27 लहानमोठ्या अपघातांचा समावेश

Advertisement

पणजी : राज्यात नववर्षाच्या प्रारंभीच भीषण अपघातांचे सत्र सुरु सुरू झाले आहे. नववर्षाच्या पहाटे चार विविध ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये चार युवक ठार झाले आहेत. सर्वजण 20 ते 31 वयोगटातील आहेत. राज्यातील विविध पोलीस स्थानकांमध्ये मिळून 24 तासांत 27 छोट्यामोठ्या अपघातांची नोंद झाली आहे. मळा-पणजी येथे स्मार्ट सिटीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सोमवारी पहाटे बुलेट मोटरसायकल ख•dयात पडल्यामुळे रायबंदर येथील आयुष ऊपेश हळर्णकर (21 वर्षे) या युवकाचा मृत्यू झाला. आयुष हा माजी नगरसेवक ऊपेश हळर्णकर यांचा मुलगा आहे. ताळगाव येथे दोन दुचाकीमध्ये झालेल्या दुसऱ्या अपघातात जियांसू पितर लाकरा (23 वर्षे) या तऊणाचा मृत्यू झाला. जखमी अवस्थेत त्याला गोमेकॉत नेण्यात आले पण वाटेतच त्याचा मृत्यू झाला. पणजी पोलिसस्थानकाचे उपनिरीक्षक मयुर पणशीकर व महिला उपनिरीक्षक सपना गावस पुढाल तपास करीत आहेत.
Advertisement

वाळपईत पोलिस कॉन्स्टेबल ठार

सत्तरी तालुक्यातील ठाणे - वाळपई मुख्य रस्त्यावर हनुमान विद्यालयाजवळ  कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरून ड्युटीवर निघालेल्या पोलिस कॉन्स्टेबल उल्हास गावकर (रा. डोंगुर्ली-ठाणे) याचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी हा अपघात झाला. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी काळाने त्याच्यावर घाला घातल्यामुळे डोंगुर्ली - ठाणे गावावर शोककळा पसरली आहे. अपघातप्रकरणी कारचालक गजानन नाईक (30 वर्षे, रा.देसाईवाडा ठाणे) याला अटक करण्यात आली आहे.

भोम अपघातात वाढदिनीच मृत्यू

मुस्लिमवाडा भोम येथे रात्री स्कुटरची वीज खांबाला धडक बसून झालेल्या स्वयंअपघातात प्रतिम रोमन बोरा (31 वर्षे, मुस्लिमवाडा, मूळ आसाम) याचा त्याच्या वाढदिनीच मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अपघातासाठी स्मार्ट सिटीला दोष?

स्मार्ट सिटी अंतर्गत पणजीत रस्त्यांची कामे करीत असलेल्या कंत्राटदारांच्या कामांमुळेच मळा-पणजी येथे सोमवारी पहाटे 21 वर्षीय आयुष हळर्णकरचा बळी गेल्याचा दावा स्थानिकांकडून होत असतानाच, कंत्राटदारांनी मात्र हा दावा फेटाळून लावलेला आहे. अपघात घडू नये, यासाठी कामांच्या ठिकाणी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचे मलनिस्सारण कामाच्या पर्यवेक्षक तथा सहाय्यक अभियंता रश्मी शिरोडकर यांनी स्पष्ट केले. पणजीत स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत मळा-पणजी येथील मार्गावर मलनिस्सारण वाहिनीचे काम सुरू आहे.

स्मार्ट सिटी कंत्राटदार जबाबदार नाही

दिवसभराचे काम संपवल्यानंतर खड्ड्यांमुळे अपघात घडू नये, यासाठी कामाच्या ठिकाणी बॅरिकेड्स लावले जातात. रस्त्यावर पसरलेली माती हटवली जाते. तेथे पाणी शिंपडले जाते. त्याच पद्धतीने अपघात घडला त्या ठिकाणीही बॅरिकेड्स लावण्यात आलेले होते. शिवाय कामाची माहिती देणारा बोर्डही लावण्यात आलेला होता. कामांच्या ठिकाणी अपघात घडू नये, याची पूर्ण काळजी आम्ही घेत आहोत. त्यामुळे सोमवारच्या अपघाताला कंत्राटदारांना दोषी ठरवणे चुकीचे आहे, असे रश्मी शिरोडकर म्हणाल्या.

मंत्री मोन्सेरात यांनी घेतली दखल

महसूलमंत्री तथा पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी या अपघाताची गंभीर दखल घेतली आहे. सोमवारी सकाळी मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी रश्मी शिरोडकर यांना पाचारण करून आयुष हळर्णकरच्या अपघाताबाबत त्यांच्याशी चर्चा केली. तसेच कामांच्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना आखण्याची सूचनाही त्यांना केली.

दोन दिवसांपासून होता अंधार

आयुष हळर्णकर याचा ज्या ठिकाणच्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला, त्या परिसरात गेल्या दोन दिवसांपासून रात्रीच्या वेळचा वीज पुरवठा बंद होता, अशी माहिती समोर आली आहे. कनिष्ठ अभियंत्याने सोमवारीच याबाबतची माहिती आपल्याला दिली, असे रश्मी शिरोडकर यांनी सांगितले.

पणजीकरांनी रस्त्यावर उतरावे

स्मार्ट सिटीच्या खड्यात पडून युवकाचा मृत्यू झाला त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे. याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. स्मार्टसिटीच्या नावाखाली पणजीची चाळण करून टाकली आहे. यापुर्वी ट्रक व अन्य वाहने ख•dयांत पडत होती. आता ख•यातील हा पहिला माणूस बळी ठरलेला आहे. हा प्रकार असाच सुऊ राहिल्यास आणखी कितीजणांचा मृत्यू होईल ते सांगता येणार नाही. त्यामुळे पणजीवासियांनी आत्ताच आपली सहनशक्ती सोडून रस्त्यावर येणे गरजेचे आहे, असे शैलेश वेलिंगकर यांनी सांगितले.

आयुषच्या कुटुबियांना 50 लाख देण्याची मागणी

तारा केरकर, मनोज परब, आमदार वीरेश बोरकर, परशुराम सेनेचे अध्यक्ष शैलेंद्र वेलिंगकर यांनी पीपल्स हायस्कूल जवळ झालेल्या अपघाताच्या ठिकाणी भेट देऊन आयुष हळर्णकरच्या अपघाती मृत्यूच्या मुद्यावर पत्रकारांशी संवाद साधला. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कंत्राटदारावर आणि भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारवर  त्यांनी आरोप केले. आयुष हळर्णकर यांच्या निधनाबद्दल सदर कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि मृताच्या कुटुंबीयांना 50 लाख ऊपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article