कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्यास चार वर्षे सक्तमजुरी

03:49 PM Jul 19, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

वडूज :

Advertisement

अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या आरोपीस वडूज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने चार वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. रवी उर्फ रवींद्र विलास नवले (वय 36, रा. नवलेवाडी ता.माण) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

Advertisement

याबाबतची अधिक माहिती अशी, पीडित मुलगी 20 जून 2012 सांयकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हनुमान विद्यालय निढळ (ता. खटाव) येथून तिचा शाळेतील पेपर झाल्यानंतर घरी जात असताना वाटेतील पुलाजवळ आरोपी हा मोटार सायकल घेऊन उभा होता. त्यावेळी तो पीडिता हिस माझ्याबरोबर चल असे म्हणाला. त्यावेळी पिडीतेने नकार दिल्यावर आरोपीने जबरदस्तीने तिला त्याचे मोटार सायकलवर बसवले व तिला घेऊन शिंदेवाडी (ललगुण) येथे राहत असले बहिणीचे घरी घेऊन गेला. तेथे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सातारा येथे गेला. त्यानंतर तेथून ट्रेनमध्ये बसून मुंबई येथे घेऊन गेला व तेथे चार दिवस मुक्काम केला. सदर कालावधीत आरोपीने पीडितेसोबत ती अल्पवयीन असल्याचे माहिती असताना सुद्धा जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. पीडिता ही अल्पवयीन आहे हे माहीत असतानाही केवळ तिला उपभोगण्याच्या उद्देशाने तिची फसवणूक करून तिचे आई-वडिलांचे कायदेशीर रखवालीतून परस्पर पळवून घेऊन जाऊन तिचे सोबत शरीरसंबंध ठेवले म्हणून वगैरे मजकुराची खबर दिल्याने पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुह्यात पो.उप.नि. बी. बी. लोंढे यांनी साक्षीदारांचे जाब-जबाब नोंदवले व कसून तपास करून आरोपींविरुद्ध अति. जिल्हा व सत्र न्यायालय, वडुज येथे दोषारोपपत्र दाखल केले. वडूज येथील अति. जिल्हा व सत्र न्यायालयात या कामी सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील अजित प्रताप कदम (साबळे) यांनी काम पाहिले. यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने 14 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांचे जाब-जबाब, कागदोपत्री पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एस. कोले यांनी आरोपीला भा.द.वि.स कलम 363, 366 अन्वये दोषी ठरवून शुक्रवार दि.18 रोजी आरोपी रवी उर्फ रवींद्र विलास नवले यास 3 वर्ष सक्तमजुरी व 1000 रू दंड व दंड न भरल्यास 1 महिने साधी कैद व 4 वर्ष सक्तमजुरी व 2000 रुपये दंड, दंड न भरल्यास 2 महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.

सदर खटला चालवणे कामी उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम (मॅडम), स.पो.नि. संदीप पोमण पुसेगाव पोलीस ठाणे यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्रॉसिक्युशन स्क्वॉड पो. उप. नि. दत्तात्रय जाधव, म.पो. हवा. विजयालक्ष्मी दडस, पो. कॉ. अमीर शिकलगार, पो.कॉ. सागर सजगणे व पो.कॉ. जयवंत शिंदे यांनी सहकार्य केले.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article