Kolhapur Visarjan Miravnuk 2025: गणेश विसर्जनासाठी चार हजार पोलीस तैनात
15 सप्टेंबरपर्यंत हा पुरस्कार मंडळांना प्रदान करण्यात येणार आहे
कोल्हापूर : सार्वजनिक गणेश विसर्जन शनिवार दि.6 रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर आणि जिह्यात चार हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. गणेश आगमनापासून आतापर्यंत जिह्यात ध्वनी प्रदूषणाचे 251 गुन्हे दाखल करण्यात आले असून, भुदरगड येथे एक साउंड सिस्टीम जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाच्यावतीने गेल्या महिन्याभरापासून मंडळांसोबत समन्वय साधण्यासाठी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत 415 बैठका घेण्यात आल्या आहेत. याचसोबत साऊंड सिस्टीम चालकांसोबत 35 बैठका, मोहल्ला कमिटीच्या 46 बैठका, शांतता समितीच्या 59 बैठका अशांसह एकूण 710 बैठकांचा घेण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर शहर 132, करवीर उपविभाग 41, इचलकरंजी उपविभाग 36, शाहूवाडी उपविभाग 19, जयसिंगपूर उपविभाग 12 तर गडहिंग्लज उपविभागाच्यावतीने 11 अशा 251 जणांवर आवाज मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच विसर्जन मिरवणुकीमध्ये साउंड सिस्टीमध्ये प्रेशर मिड तंत्रज्ञान व कार्बन डाय ऑक्साईड गॅसचा वापर करण्यात बंदी घालण्यात आली आहे.
जिह्यातील 1645 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असून, 463 जणांना शहरातून तात्पुरते हद्दपार करण्यात आले आहे. 15 सप्टेंबरपर्यंत गणराया अवॉर्डचे वितरण पर्यावरण पूरक तसेच सामाजिक भान राखून विधायक पद्धतीने गणेशउत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना गणराया अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येते.
15 सप्टेंबरपर्यंत हा पुरस्कार मंडळांना प्रदान करण्यात येणार आहे. याचे नियोजन सुरु असून, पोलीस स्टेशन, उपविभागीय पातळीवर याचे नियोजन सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी दिली. निर्भया पथक, धक्का पथक अॅक्टीव्ह सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी जिह्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त नेमण्यात आला आहे.
कोल्हापूर शहर, इचलकरंजी व इतर ठिकाणी 200 अधिकारी, 2 हजार पोलीस, 1500 होमगार्ड व जलदकृती दलाची पथके तैनात असतील. महिलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया पथके, साध्या वेशातील पोलिसही मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. याचसोबत मिरवणूक रेंगाळू नये यासाठी धक्का पथकही अॅक्टीव्ह ठेवण्यात आले आहे.
विसर्जनासाठीचा बंदोबस्त पोलीस अधीक्षक 1, अपर पोलीस अधीक्षक 2, पोलीस उपअधीक्षक 9, पोलीस निरीक्षक 31, सहायक निरीक्षक/ उपनिरीक्षक 159, पोलीस अंमलदार 1504, होमगार्ड 1495, जलदकृती दलाची पथके 11.
यंदाही तीन पर्यायी मार्ग पारंपरिक मार्ग
उमा टॉकीज चौक, सवित्रीबाई फुले हॉस्पीटल, टेंबे रोड, खासबाग मैदान, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेश, रंकाळा स्टॅंन्ड, जाऊळाचा गणपती, इराणी खण समांतर मार्ग - उमा टॉकीज , आझाद चौक, कॉमर्स कॉलेज, दुर्गा हॉटेल, बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पापाची तिकटी, गंगावेश मार्गे इराणी खण
पर्यायी मार्ग
"उमा टॉकीज चौक, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, गोखले कॉलेज चौक, हॉकी स्टेडीयम चौक, इंदिरा सागर चौक, संभाजीनगरमार्गे इराणी खण. मंडळांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा गणेश विसर्जन मिरवणूकीसाठी यंदाही प्रशासनाच्या वतीने तीन मार्ग तयार केले आहेत. मिरवणुकीमध्ये सहभागी न होणाऱ्या मंडळांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा तसेच वृद्ध, महिला आणि लहान मुलांनी गर्दीच्या ठिकाणी टाळावे."
- योगेशकुमार गुप्ता, पोलीस अधीक्षक