2027 विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जमातीसाठी चार राखीव जागा; दोन-तीन दिवसांत अधिसूचना : मंत्री तवडकर
02:12 PM Aug 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पणजी : 2027 मध्ये होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जमाती (एसटी) समाजासाठी चार विधानसभा मतदारसंघ राखीव करण्यात येणार असून, त्यासंदर्भातील अधिसूचना येत्या दोन ते तीन दिवसांत जारी केली जाईल, अशी माहिती मंत्री तवडकर यांनी दिली.
Advertisement
मंत्री तवडकर यांनी सांगितले की, अनुसूचित जमाती समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी सरकारने आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली असून, चार जागा राखीव करण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना पुढील दोन ते तीन दिवसांत प्रसिद्ध होईल. या निर्णयामुळे अनुसूचित जमाती समाजाला विधानसभेत अधिक प्रभावी प्रतिनिधित्व मिळण्यास मदत होणार असून, २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच चार राखीव मतदारसंघांमधून निवडणूक होणार आहे.
Advertisement
Advertisement