For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तोतया पीएसआयसह चौघांना अटक

12:00 PM Dec 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
तोतया पीएसआयसह चौघांना अटक
Advertisement

धमकी देऊन उकळत होते पैसे : बेंगळूरच्या विद्यारण्यपूर पोलिसांची कारवाई

Advertisement

बेंगळूर : पोलिसांचा गणवेश परिधान करून खरे पोलीस अधिकारी असल्याचे भासवत धमकी देऊन पैसे उकळणाऱ्या तोतया पीएसआयसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. बेंगळूरच्या विद्यारण्यपूर पोलिसांनी रविवारी ही कारवाई केली. मल्लिकार्जुन, प्रमोद, विनय आणि ऋतिक अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. कट रचून संशयितांनी घरात घुसत धमकावून पैसे लुटले होते. पोलिसांनी अशाप्रकारे एका व्यक्तीला धमकावून दरोडा टाकणाऱ्या चार जणांना अटक केली आहे.

मल्लिकार्जुनने पीएसआय होण्यासाठी दोनदा परीक्षा दिली होती. मात्र, तो नापास झाला होता. परंतु तो परीक्षा उत्तीर्ण होऊन पीएसआय झाल्याचे गावात भासवत होता. पोलिसांचा गणवेश, टोपी आणि बूट घालून फोटोशूट करत असे. तसेच तो त्याच्या गावी सिरगुप्पामध्ये आपण बेंगळूरमध्येही पीएसआय असल्याचे सांगत होता.

Advertisement

विलासी जीवन जगू इच्छिणाऱ्या मल्लिकार्जुनला संशयित ऋतिक साथ दिला होता. नवीन नामक व्यक्तीवर ऋतिक बारीक लक्ष ठेवून होता. जर नवीनच्या घरात गेल्यास भरपूर पैसे आणि दागिने मिळतील, असे त्याने मल्लिकार्जुनला सांगितले होते. त्यानुसार, पोलिसांच्या गणवेशात असलेले संशयित 7 डिसेंबर रोजी कारने जाऊन नवीनच्या घरात घुसले. तसेच तु गांजा विकत असून तुझ्या घराची झडती घेतली जाईल, असे धमकावून सांगितले. तसेच नवीनला लाठी आणि लोखंडी रॉडने हल्ला केला होता.

तु पैसे दिलास तर तुला अटक करणार नाही असे सांगून संशयितांनी त्याच्या खात्यातून 87,000 रुपये, त्याच्या पाकिटातून 53,000 रुपये आणि त्याच्या पर्समधून 2000 रुपये घेऊन पलायन केले होते. या घटनेनंतर नवीनने याप्रकरणी विद्यारण्यपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. विद्यारण्यपूर पोलिसांनी कारवाई करून तोतया पीएसआयसह चार जणांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून 45,000 रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे.

Advertisement
Tags :

.