कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मानवी अनैतिक व्यापार प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल

04:09 PM Dec 10, 2024 IST | Radhika Patil
Four people booked in human trafficking case
Advertisement

सातारा : 

Advertisement

सोनगाव (ता. सातारा) गावच्या हद्दीतील मंदिराजवळ मानवी अनैतिक व्यापार प्रकरणी चार जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश मनोहर भोसले (वय 26, रा. कोरेगाव ता. सातारा), ईश्वर सुभाष जाधव (वय 30, रा. विलासपूर सातारा), विरेंद्र महेंद्र जाधव (वय 21, रा. सदरबाजार सातारा), कल्याणी अनिल वाघमारे (वय 33, रा. आसनगाव ता. सातारा) अशी त्यांची नावे आहेत.

Advertisement

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोनगाव गावच्या हद्दीतील खिंडवाडी ते सोनगाव जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर मानवी अनैतिक व्यापार सुरू असल्याची माहिती सातारा तालुका पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. यावेळी गणेश मनोहर भोसले, ईश्वर सुभाष जाधव, विरेंद्र महेंद्र जाधव आणि कल्याणी वाघमारे यांनी आपापसात संगनमत करून दोन महिलांच्या गमनाचा मोबदला स्वत:च्या उपजीविकेसाठी स्वीकारला. तसेच पीडित महिलांना ग्राहकांसाठी उद्युक्त केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी संबंधितांकडून रोख रकमेसह मोबाईल्स आणि दोन दुचाकी असा 2 लाख 27 हजार पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक निलेश तांबे करीत आहेत.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article