For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Karad Crime : कराड एसटी स्टँड परिसरात अल्पवयीन विद्यार्थ्यावर चौघांचा हल्ला

05:49 PM Jan 08, 2026 IST | NEETA POTDAR
karad crime   कराड एसटी स्टँड परिसरात अल्पवयीन विद्यार्थ्यावर चौघांचा हल्ला
Advertisement

                               कराड शहरात विद्यार्थी सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

Advertisement

कराड : शहरातील एसटी स्टँड परिसरात जुन्या वादातून अल्पवयीन विद्यार्थ्यावर चौघांनी मिळून मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या प्रकरणी विंग (ता. कराड) येथील १६ वर्षीय मुलाने कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार १६ वर्षीय मुलगा सैदापुरातील कॉलेजमधे इयत्ता ११ वी मध्ये शिक्षण घेत असून दुपारी कराड एसटी स्टँडवर बसची वाट पाहत थांबला होता. त्यावेळी चौघेजण तेथे
आले. एकाने पाठीमागून येत १६ वर्षीय मुलाच्या उजव्या खांद्यावर हात ठेवला. त्याने मागे वळून पाहताच चौघांनी शिवीगाळ व दमदाटी करत त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.

Advertisement

यावेळी एकाने हातातील कड्याने त्याच्या डोक्यावर मागून मारल्याने त्याच्या डोक्यातून रक्तस्राव झाला. रक्त दिसताच आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. जखमी मुलगा चक्कर येऊ लागल्याने त्याला उपचारासाठी गुजर हॉस्पिटल, कराड येथे दाखल करण्यात आले. यानंतर जखमी मुलाने आई-वडिलांसह कराड शहर पोलीस ठाण्यात हजर राहून तक्रार दाखल केली.

Advertisement
Tags :

.