महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मधमाशांच्या हल्ल्यात चार जण अत्यवस्थ, आठ जण जखमी

06:45 AM Nov 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील उचगाव फाट्यावरील घटना

Advertisement

उचगाव/वार्ताहर

Advertisement

बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील उचगाव फाट्यावर मधमाशांनी या मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांवर हल्ला केल्याने चार जण अत्यवस्थ व आठ जण जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली.

या घटनेची माहिती सर्वत्र पसरल्याने या मार्गावरील या उचगाव फाट्यापासून सुळगा, तुरमुरी आणि उचगाव या चोहोबाजूंनी दोन किलोमीटर अंतराच्या भागात काहीकाळ प्रवासी मधमाशांची चाहूल पाहूनच पुढे सरकत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत होते. परिणामी काहीकाळ या परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

उचगाव फाट्यावर असलेल्या झाडावर गेल्या पंधरा दिवसापासून मोठे मधमाशांचे पोळे बसलेले होते. अकस्मात शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास या पोळ्यातील मधमाशांनी रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांवर हल्ला करून अत्यवस्थ केले. त्या ठिकाणी सापडलेले नागरिक, स्त्रिया व शाळेची मुले यांना कुठे जायचे समजले नाही. सर्वजण भयभीत झाले आणि वाट मिळेल तिकडे सर्वजण धावाधाव आणि आरडाओरड करत पळत सुटले.

ही घटना वाऱ्यासारखी सर्वत्र पसरल्याने तिन्ही रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. नेमके याच फाट्यावर चार जण या मधमाशांच्या हल्ल्यात अत्यवस्थ झाले. येथे काही जमलेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखत अॅम्बुलन्स मागवत त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यावेळी ग्राम पंचायतचे उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, सदस्य एल. डी. चौगुले, गजानन नाईक यांनाही सदर वृत्त समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी हजर होऊन मधमाशांच्या हल्ल्यातील जखमींना उपचारासाठी तातडीने बेळगावला पाठवण्याची व्यवस्था केली. तर काही जखमी उचगावमध्ये असलेल्या खाजगी दवाखान्यामध्ये उपचार घेऊन घरी गेले.

वन खात्याने सर्वच महामार्गावरील जिथे जिथे उंच झाडे आहेत. अशा ठिकाणी मधमाशांची पोळी बसलेली असतील, तर त्याची पाहणी करून या मधमाशांपासून प्रवासी, नागरिकांचे संरक्षण कसे होईल याची खबरदारी घ्यावी, अशी विनंती या भागातील प्रवासी आणि नागरिकांतून करण्यात येत आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article