For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चार नवे आयपीओ बाजारात होणार खुले

06:52 AM Jun 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
चार नवे आयपीओ बाजारात होणार खुले
Advertisement

क्लेक्राफ्ट, दिक्षा पॉलिमर्स, लिपफ्रॉग इंजिनियरिंग यांचा समावेश : या आठवड्यात असणार गुंतवणुकीची संधी

Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

15 जूनपासून सुरू होणाऱ्या आठवड्यामध्ये चार नवे आयपीओ बाजारात गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. हे सर्व आयपीओ एसएमई गटात खुले होणार असल्याची माहिती मिळते आहे. याशिवाय मागच्या आठवड्यात दोन आयपीओ खुले झाले असून त्यामध्येही गुंतवणूकीची संधी गुंतवणूकदारांना असणार आहे.

Advertisement

आयपीओ दाखल होणाऱ्या कंपन्या

क्लेक्राफ्ट- यांचा आयपीओ 17 जून रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार असून 19 जूनला बंद होणार आहे. हा आयपीओ 110 कोटी रुपयांचा असणार असून 193 ते 203 रुपये समभाग अशी इशु किंमत निश्चित करण्यात आली आहे. 600 समभागांचा लॉट साईज असेल. एनएसई एसएमईवर 24 जूनला समभाग सुचिबद्ध होऊ शकतात.

दिक्षा पॉलिमर्स - यांचा आयपीओ 17 कोटी रुपयांचा असणार असून 17 जून रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. यामध्ये 19 जूनपर्यंत गुंतवणुकदारांना पैसे गुंतविता येणार आहेत. 112 रुपये प्रतिसमभाग अशी इशु किंमत निश्चित करण्यात आली असून 24 तारखेला समभाग शेअर बाजारात सुचिबद्ध होऊ शकतो.

लिपफ्रॉग इंजिनिअरींग- कंपनी आयपीओच्या माध्यमातून 88.51 कोटी रुपये उभारणार आहे. 21 ते 23 रुपये प्रतिसमभाग अशी इशु किंमत निश्चित करण्यात आली असून 17 जून रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणारा आयपीओ 19 जूनला बंद होणार आहे.

यासोबत लियोटेक इंडस्ट्रिजचा आयपीओ 17 जूनला खुला होणार आहे. कंपनी 36 कोटी रुपये उभारणार आहे. 321 रुपये समभागाची किमत आहे.

सुसान इलेक्ट्रिकल्स इंडिया- 70.38 कोटी रुपये आयपीओच्या माध्यमातून उभारले जाणार असून 15 जून रोजी आयपीओ गुंतवणुकीसाठी बंद होणार आहे. हा आयपीओ आतापर्यंत 16.37 पट भरला गेला आहे. 120 ते 127 रुपये प्रतिसमभाग अशी इशु किंमत असेल.

हॉरिझन रिक्लेम (इंडिया)- हा आयपीओ 12 जून रोजीच गुंतवणुकीसाठी खुला झाला होता आणि 16 जून रोजी तो बंद होईल. आतापर्यंत 8.39 पट इतका आयपीओ सबस्क्राईब झाला आहे. 54 कोटी रुपये कंपनी उभारणार असून 98 ते 103 रुपये प्रतिसमभाग किमत असेल.

.हे समभाग होणार सुचीबद्ध

15 जूनला सुरू होणाऱ्या आठवड्यात 17 जून रोजी एनएसई एसएमईवर उत्कल स्पेशालिटी यांचे समभाग तर 18 रोजी बीएसई एसएमईवर सुसान इलेक्ट्रिकल्स आणि 19 जून रोजी बीएसई एसएमईवर हॉरिझन रिक्लेमचे समभाग  सुचिबद्ध होतील.

Advertisement
Tags :

.