For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आणखी चार संस्था प्रशासनाच्या रडारवर

01:30 PM May 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
आणखी चार संस्था प्रशासनाच्या रडारवर
Advertisement

शिवम असोसिएट्सनंतर सतर्कता

Advertisement

बेळगाव : शिवबसवनगर येथील शिवम असोसिएट्सच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू असतानाच जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी अशा आणखी चार संस्था प्रशासनाच्या रडारवर असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आणखी काही संस्थांवर कारवाई होणार, हे स्पष्ट झाले आहे. जे राष्ट्रीयीकृत बँकांनाही शक्य नाही ते अशा संस्था करू लागल्या आहेत. अलीकडेच जिल्हाधिकारी कार्यालयात केपीआयडी व बड्स कायद्यांतर्गत एक विशेष विभाग सुरू करण्यात आला आहे. या विभागात सोशल मीडिया व इतर प्रसारमाध्यम आदींवर लक्ष ठेवून गुंतवणूकदारांना जादा व्याजदराचे आमिष दाखवून ठकविण्याच्या तयारीत असलेल्या संस्थांची माहिती जमविण्यात येत आहे.

अशा संस्थांची चौकशी व कारवाईसाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना विशेष अधिकार देण्यात आला आहे. स्पाँजी स्कीममुक्त बेळगावसाठी काम सुरू आहे. जिल्हा पातळीवरील विशेष विभागात वेगवेगळ्या खात्यांचे अधिकारी व कर्मचारी यासाठी कार्यरत आहेत. सध्या शिवम असोसिएट्सची चौकशी सुरू आहे. मात्र, अशा आणखी चार संस्था रडारवर असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. पोलीस आयुक्तांशी आपली चर्चा झाली आहे. पोलीस दलाकडून बेळगाव शहर व जिल्ह्यातील अशा संस्थांची चौकशी सुरू आहे. चौकशी पूर्ण होताच लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होण्याआधीच  रोखण्याचे काम करण्यात येत आहे. गुंतवणूकदारांचा पैसा सुरक्षितपणे ठेवून त्यांना परत करण्यासंबंधीही प्रशासनाचे प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.