Solapur News | मजरेवाडी परिसरातून एकाच कुटुंबातील चौघे बेपत्ता; शहरात मोठी खळबळ
सोलापुरात एकाच कुटुंबातील चौघे बेपत्ता
सोलापूर -शहरातील मजरेवाडी परिसरातील राजीव गांधी नगरात राहणारी महिला, तिचे वडील आणि तिची दोन मुले असे चौघेजण बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे.शाहीस्ताबेगम अमीन सय्यद (वय २७, रा. भांडेगाव, ता. बार्शी), तिचे वडील सलीम अमीर सय्यद (वय ४९, रा. राजीव गांधी नगर, मजरेवाडी, सोलापूर), तिची मुलगी इंन्शा अमीनशाहीस्ताबेगम सय्यद सलीम सय्यदसय्यद (वय ७) आणि मुलगा तैमुर अमीन सय्यद (वय ६, रा. भांडेगाव,) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत निसार सलीम सय्यद (वय २५, मजरेवाडी) यांनी एमआयडीसीतैमुर सय्यद इंन्शा सय्यद पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे.सय्यद यांची शाहिस्ताबेगम बहीण व सलीम वडील आहेत. शाहिस्ताबेगम या त्यांची मुले इंन्शा व तैमुर यांना घेऊन गेल्या काही दिवसांपूर्वी माहेरीआल्या होत्या. ८ रोजी हे चौघेही सायंकाळी घरातून कुणालाही न सांगता निघून गेले. ते परत न आल्याने निसार यांनी नातेवाईकांकडे शोध घेतला. परंतु, ते मिळून आले नाहीत. त्यामुळे याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याबाबतची नोंद केली आहे. या चौघांबाबत कुणालाही काहीही माहिती मिळाल्यास त्यांनी महिला पोलीस हवालदार वाघमोडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.