For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आठ दिवसांत चार विवाहिता, एक तरुणी बेपत्ता; २३ ते २५ वय हाच सामान धागा, कोल्हापूर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

12:41 PM Sep 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
आठ दिवसांत चार विवाहिता  एक तरुणी बेपत्ता  २३ ते २५ वय हाच सामान धागा  कोल्हापूर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
Advertisement

कोल्हापूर : जिल्ह्याच्या विविध भागातून गेल्या आठ दिवसांत २३ ते २५ वयोगटातील ४ विवाहित आणि १ अविवाहित तरुणी बेपत्ता झाल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासर्व प्रकरणात कुटुंबियांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात जबरदस्तीने नेल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. अद्याप एकाही प्रकरणात अटक झालेली नाही.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कसबा सांगाव (ता. कागल) येथील राहत्या घरातुन २३ वर्षीय मुलीला अज्ञाताने पळवून नेल्याची फिर्याद कागल पोलीस ठाण्यात दाखल आहे. मूळ विजापूर कर्नाटक येथील व सध्या कामानिमित्त जयसिंगपूर रेल्वे स्टेशन जवळ राहणाऱ्या कष्टकरी कुटुंबाच्या २५ वर्षीय मुलीला अज्ञाताने जबरदस्तीने नेल्याची तक्रार जयसिंगपूर पोलिसात दाखल केली आहे.

आंबेडकरनगर, गणेश कॉलनी जाधववाडी येथील एक २५ वर्षीय विवाहिता बेपत्ता झाली असून याप्रकरणी शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. आणखी एका प्रकरणात दिंडेनगर, पाचगाव येथील २५ वर्षीय विवाहिता व सांगरूळ फाटा येथील २५ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार मुलीच्या वडीलांनी व पतीने करवीर पोलिसात दिली आहे. या सर्व घटनांमध्ये संशयित आरोपी म्हणून अज्ञातावर गुन्हा नोंद केला असून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे. सर्व अपहृता तरुणींचे वय २३ ते २५ दरम्यान आहे, हा समान धागा असल्याने पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, या घटनांमुळे परिसरात चिंतेचे वातावरण आहे. संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी अधिक तपास करत असून बेपत्ता तरुणींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

Advertisement

Advertisement

.