For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कार नदीत कोसळून चौघे ठार, तिघांना वाचवले

06:06 AM Apr 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
कार नदीत कोसळून चौघे ठार  तिघांना वाचवले
Advertisement

श्रीनगर-लेह महामार्गावर दुर्घटना

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

मध्य काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील सोनमर्ग भागात प्रवाशांनी भरलेली कार सिंध नाल्यात पडल्याने खळबळ उडाली. एक तवेरा गाडी 9 प्रवाशांना घेऊन जात असताना असंतुलित होऊन नाल्यात कोसळली. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे तर 3 जणांना वाचवण्यात यश आले आहे. 2 जण अद्याप बेपत्ता आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्मयता वर्तवली जात आहे. मदत व बचावकार्यात लष्कर व हवाई दलाचीही मदत घेण्यात आली.

Advertisement

श्रीनगर-लेह महामार्गावरील गगनगीर सोनमर्ग येथे सिंध नाल्यात वाहन कोसळून ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले. स्थानिक लोकांकडून माहिती मिळाल्यानंतर बचाव पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले. तिघांना वाचवण्यात आले असून त्यांना गुंड येथील पीएचसी ऊग्णालयात हलवण्यात आले आहे.

Advertisement

.