दोन ट्रकच्या धडकेत आंध्रात चौघांचा मृत्यू
06:19 AM Jul 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ अमरावती
Advertisement
आंध्र प्रदेशातील बोयापालेम गावात बुधवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. या धडकेनंतर एका ट्रकला आग लागल्याने त्यातील चार जणांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, धडकेनंतर कागदाने भरलेल्या ट्रकला आग लागली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अपघाताच्या कारणाचा तपास सुरू केला आहे. दोन ट्रकची धडक बसताच काही मिनिटातच वाहनाला आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातानंतर तातडीने अग्निशमन दल आणि पोलिसांना पाचारण करण्यात आले. मात्र, तत्पूर्वी चौघांचा जळून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
Advertisement
Advertisement