For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जम्मूतील भूस्खलनात मुलांसह चौघांचा मृत्यू

06:22 AM Mar 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
जम्मूतील भूस्खलनात मुलांसह चौघांचा मृत्यू
Advertisement

घरावर दरड कोसळल्याने दुर्घटना

Advertisement

वृत्तसंस्था/ जम्मू

जम्मू-काश्मीरमधील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पाऊस व हिमवृष्टी सुरू असून पावसामुळे भूस्खलनाच्या दुर्घटनाही घडल्या आहेत. रियासी जिल्ह्यात माहोर उपविभागातील चासणा गावात दरड कोसळून भूस्खलनामुळे एक घर कोसळले. या दुर्घटनेत 2 महिन्यांचे बाळ, त्याची आई आणि आत झोपलेल्या इतर दोन मुलांचा मृत्यू झाला. रियासीचे उपायुक्त विशेष पॉल महाजन यांनी घटनेची माहिती दिली आहे.

Advertisement

जम्मू-काश्मीरमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी सुरूच असल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या आणि हिमस्खलनाच्या घटना समोर येत आहेत. चासणा गावात भूस्खलनामुळे एक घर कोसळून एक महिला आणि तिच्या तीन मुलांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच रामबन जिह्यातील धलवास भागात भूस्खलनामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग सलग दुसऱ्या दिवशीही बंद आहे. दरड कोसळल्याने रस्त्यावर ढिगारा साचला आहे. यासोबतच मैदानी भागात पावसाचा जोर कायम आहे.

Advertisement

.