For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

होनिहाळमध्ये चार घरे फोडली

10:51 AM Jan 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
होनिहाळमध्ये चार घरे फोडली
Advertisement

18 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

Advertisement

बेळगाव : बेळगाव शहर व तालुक्यात चोऱ्या, घरफोड्यांचे सत्र थांबता थांबेना. होनिहाळ येथे चार घरे फोडण्यात आली असून चोरट्यांनी सुमारे 17 लाख 89 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज पळविला आहे. मारिहाळ पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. होनिहाळ येथील गुंडू शामू तळवार यांनी मारिहाळ पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. आंबेडकर गल्ली व कुरबर गल्ली येथील बंद घरांना चोरट्यांनी लक्ष्य बनविले आहे. 5 जानेवारीच्या दुपारी 2 पासून शुक्रवारी 9 जानेवारी रोजी सकाळी 6.30 यावेळेत या घटना घडल्या आहेत.

बंद घरांचा कडीकोयंडा तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड पळविण्यात आली आहे. एकाच टोळीतील गुन्हेगारांनी हे कृत्य केल्याचा संशय आहे. चोरट्यांनी एकूण 225 ग्रॅम सोन्याचे दागिने, 250 ग्रॅम चांदीचे दागिने व 6 लाख 12 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 17 लाख 89 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज पळविला आहे. मंगळसूत्र, ब्रेसलेट, अंगठ्या, नेकलेस, चेन, लहान अंगठ्या, कर्णफुले, लहान मुलांच्या पायातील चांदीच्या चेन, करदोडा, कडे असे मोठ्या प्रमाणात दागिने व रोकड पळविली आहे. शुक्रवारी दुपारी मारिहाळ पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला असून चोरट्यांचा माग काढण्यासाठी ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. मारिहाळ पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

अमननगरात 70 हजारांची चोरी...

अमननगर येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून दागिने व 30 हजार रुपये रोख रक्कम असा 70 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविला आहे. रोहेल पेंढारी यांच्या घरी चोरी झाली असून 6 जानेवारी ते 7 जानेवारी या काळात दर्शनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून 70 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविला आहे. माळमारुती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

Advertisement
Tags :

.