For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चार माजी केंद्रीय मंत्र्यांनी सरकारी बंगले केले रिक्त

06:28 AM Jul 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
चार माजी केंद्रीय मंत्र्यांनी सरकारी बंगले केले रिक्त
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्यासह चार माजी केंद्रीय मंत्र्यांनी लुटियन्स दिल्लीतील आपले सरकारी बंगले रिकामे केले आहेत. याचदरम्यान नव्या मंत्र्यांना बंगले वाटप करण्याबाबत चर्चा करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत नवीन मंत्र्यांना सरकारी निवासस्थाने देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. केंद्रीय गृहनिर्माण मंत्री मनोहरलाल खट्टर यांना 3, कृष्ण मेनन मार्ग येथे बंगला मिळणे अपेक्षित आहे. हा बंगला यापूर्वी माजी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे होता.

माजी केंद्रीय मंत्री इराणी यांनी या आठवड्याच्या सुऊवातीला ल्युटियन्स दिल्लीतील 28, तुघलक क्रिसेंट येथील आपले अधिकृत निवासस्थान रिकामे केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमेठी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या किशोरीलाल शर्मा यांच्याकडून दीड लाखांहून अधिक मतांनी त्यांचा पराभव झाला. मागील केंद्र सरकारमध्ये त्या महिला व बालविकास मंत्री होत्या.

Advertisement

माजी मंत्र्यांना सरकारी बंगले खाली करण्यासाठी नोटिसा पाठविण्यात आल्या असून नवीन सरकार स्थापन झाल्यापासून एक महिन्याच्या आत अधिकृत निवासस्थाने रिकामी करायची आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी मंत्रिमंडळातील 17 केंद्रीय मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. आर. के. सिंग, अर्जुन मुंडा, महेंद्रनाथ पांडे, स्मृती इराणी, संजीव बल्यान, राजीव चंद्रशेखर, कैलाश चौधरी, अजय मिश्रा टेनी, व्ही. मुरलीधरन, निशिथ प्रामाणिक, सुभाष सरकार, साध्वी निरंजन ज्योती, रावसाहेब दानवे, भारती पवार यांच्यासह इतरांना बंगले रिकामे करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

Advertisement
Tags :

.