For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मळगावात अंगणात आढळली चार फूट लांबीची मगर

11:30 AM Mar 28, 2026 IST | अनुजा कुडतरकर
मळगावात अंगणात आढळली चार फूट लांबीची मगर
Advertisement

न्हावेली /वार्ताहर

Advertisement

मळगाव रेल्वे स्टेशन परिसरातील बिल्डिंगच्या तळमजल्यात शुक्रवारी सायंकाळी ४ फूट लांबीची मगर आढळून आली. थेट मानवी वस्तीत आणि इमारतीच्या आवारात मगरीचा वावर दिसून आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.येथील एका इमारतीच्या तळमजल्यावरील बंद घराच्या बाजूला असलेल्या अंगणात ही मगर सुस्त पडलेली काही रहिवाशांना दिसून आली. सुरुवातीला काहीतरी हालचाल जाणवल्याने नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले असता, तिथे मगर असल्याचे स्पष्ट झाले. ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरताच मगरीला पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. निरवडे रेल्वे स्टेशनचा परिसर आणि आजूबाजूला असलेला नैसर्गिक अधिवास पाहता, ही मगर भक्ष्याच्या शोधात नागरी वस्तीत भरकटत आली असावी,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी तातडीने वनविभागाला दिली.माहिती मिळताच वनविभागाची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी मगरीला सुरक्षितपणे रेस्क्यू केले. वनविभागाने मगरीला ताब्यात घेतल्याने रहिवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.